रत्नागिरीतील मिरजोळेमध्ये पुन्हा जमीन खचली

23

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे येथे शेतजमीन खचण्याचा प्रकार सुरुच आहे. सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतजमीन मोठ्या प्रमाणात खचली़ आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर मंगळवारी प्रशासकीय अधिकारी, तलाठी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली़ जमीन खचत असल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. गेली अनेक वर्षांपासून जमीन खचण्याचा प्रकार सुरू आहे. त्यावर तोडगा काढण्यात प्रशासनाला अपयश आले आहे़. खचणार्‍या जमीनीमुळे गावकर्‍यांच्या शेतीचे नुकसान होत आहे़.

आपली प्रतिक्रिया द्या