राष्ट्रवादीला मत देऊन वाया घालवू नका, प्रितम मुंडेंच्या पाठीशी उभे रहा – जयदत्त क्षीरसागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

बोरखेड आणि परिसरातील मतदारांवर आपला मोठा विश्‍वास असून राष्ट्रवादीला मत देऊन आपली मते वाया घालवू नका. महिलांनी एका महिलेला पूर्ण ताकद देऊन भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे.

भाजप- शिवसेनेच्या विजयाची गुढी उभारा, बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर कडाडले

भाजप शिवसेना-रिपाई-रासप-रयत क्रांती महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रितम गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेच्या प्रसंगी जयदत्त क्षीरसागर बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, आज सर्वजण विशिष्ट ध्येय आणि उद्दीष्ट समोर ठेवून एकत्र आलो आहोत. देश जगला तर आपण जगणार आहोत अनेक वर्षांपासूनचा प्रवास थांबवावा लागला. सर्वांना बरोबर घेऊन निष्ठेने काम केले परंतू पक्षाला किंमत वाटली नाही. आघात आणि आरोप सहन केले विकास हीच जात मानून आपण राजकारणात काम केले आहे. ज्यांनी कधी गावात येऊन एखादा विकास करून दाखवला नाही तेच आज मत मागत फिरत आहेत.

जयदत्त क्षीरसागर मातोश्रीवर, विरोधकांच्या पोटात गोळा

आरक्षणाच्या मागण्या 50 वर्षापासून होत्या त्या मागण्या युती सरकारने मंजूर केल्या आहेत. एवढेच नाही तर 10 टक्के सवर्णांना आरक्षण मिळाले आहे. आपल्यासाठी कोणते सरकार महत्वाचे आहे हे ओळखा बीड जिल्ह्यासाठी आणि विकासासाठी डॉ.प्रितमताई मुंडे यांना प्रचंड मतदानाने विजयी करा पुढचे चित्र लक्षात घ्या. एकदाच कर्जमाफीचा निर्णय घेतला त्याचाच गाजावाजा करत असून युती सरकारने वर्षाला 72 हजार कोटी देण्याचा संकल्प केला आहे शेतकर्‍यांसाठी ही महत्वाची बाब आहे. आम्ही प्रामाणिकपणे सांगतो, प्रामाणिकपणे काम करतो, पुढेही कामे करायची आहेत हे सांगून युतीच्या उमेदवाराचा प्रचार करून कार्यकर्त्यांनी सर्वाधिक मताधिक्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोरखेड आणि परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.