भाजप- शिवसेनेच्या विजयाची गुढी उभारा, बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर कडाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

आपण लाचार नाही आहोत कोणाला घाबरण्याचे कारण नाही, किती अहवेलना सहन करायची, राष्ट्रवादी सैराट झाली आहे, राष्ट्रवादीला नाही राष्ट्रवादाला प्राधान्य द्या, उद्या पाडवा आहे. भाजप शिवसेनेच्या विजयाची गुढी उभारा, असे आवाहन बीड मध्ये जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे विधिमंडळ उपनेते जयदत्त क्षीरसागर यांनी बीडमध्ये त्यांच्या समर्थकांचा मेळावा घेतला. बीडमध्ये घेतलेल्या समर्थकांचा मेळाव्यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात संताप व्यक्त केला. कोणत्याही पक्षात जा फक्त राष्ट्रवादी सोडा आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आश्वासन समर्थकांनी क्षीरसागर यांना दिले. या वेळी आपल्या बोलतांना आमदार जयदत्त क्षीरसागर म्हणाले, या बहाद्दर जनतेने मला नेहमीच कवच कुंडले दिली आहेत, प्रेमाच नातं रक्ताच्या नात्यापेक्षा मोठे आहे, काही निर्णय घेतांना त्रास होतो, ज्या वेळी पक्षाने जबाबदारी टाकली त्या त्या वेळी कठीण परिस्थिती असताना जबाबदारी समर्थपणे पार पाडली, आता राष्ट्रवादी कोण चालवत आहे हेच कळेना, ज्यांनी पक्ष बांधला. पक्ष उभा केला त्या लोकांना बाहेर जाण्यासाठी मजबूर केले गेले. राष्ट्रवादी हा सैराटाचा पक्ष झाला आहे. स्थानिक स्वराज निवडणुकीत पक्षविरोधी नेत्यांनी आम्हाला कोपऱ्यात बसवले. मी कमकुवत नाही संयमी आहे. या संयमाचा बांध आता तुटला आहे. किती सहन करायचं . संपूर्ण राज्याला माहीत आहे माझ्यावर एक ही डाग आतापर्यंत लागला नाही, मी कधी जातीयवाद केला नाही, राष्ट्रवादीत अपप्रवृत्ती वाढली आहे या प्रवृत्तीला आता रोखावेच लागणार आहे, निर्णय काय घ्यायचा, आपण त्या पक्षाचे आमदार आहोत, तरी ही आपण राष्ट्रवादीला नव्हे राष्ट्रवादाला प्राधान्य देऊ , आपण लाचार नाहीत ना कोणाचे बांधील आहोत. अहवेलना सहन करायची नाही लढा द्यायचा आहे, वज्रमुठ आवळा, उद्या पाडवा आहे, भाजपा शिवसेनेच्या विजयाची गुढी उभारा असे त्यांनी म्हंटले