बुलेट ट्रेनचे कर्ज सामान्यांच्या माथी, राज ठाकरे यांचा आरोप

453

शिवछत्रपतींची भूमी म्हणून महाराष्ट्र व मराठीची ओळख आहे. त्यामुळे शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकारण करण्यापेक्षा शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन केले पाहिजे असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.

मागाठाणे विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांची प्रचार सभा आयोजित केली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली.मुंबई अहमदाबाद मार्गावरील 48 टक्के ट्रेन रिकाम्या धावतात.मग या मार्गावर बुटेल ट्रेनचा अट्टाहास का असा प्रश्न त्यांनी केला. बुलेट ट्रेनचे कर्ज सामान्य माणसाच्या माथी मारले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पीएमसी बँकच्या मुद्यावरूनही त्यांनी भाजपवर टीका केली. लोकांच्या आयुष्यभराच्या ठेवी कशा काय बुडू शकतात. खातेदारांचे पैसे बुडल्यावर सरकारने हात वरती केली. आरबीआयचा आमचा काही संबंध नाही असे सांगतात. पण मग या बँकांना मान्यता कशी दिली जाते असा प्रश्न त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या