
शहरात 15 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या 71.8 टक्के महिलांकडे आणि 90 टक्के पुरुषांकडे मोबाईल आहेत. सध्याच्या काळात मोबाईल सगळ्यांच्या हाती असतो. मोबाईल म्हणजे रोजच्या जगण्याचा भाग बनलाय. महिलाही मोबाईल फोनचा वापर करतात. मात्र हे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. ग्रामीण भागात महिला मोबाईल आणि इंटरनेटचा वापर तर करतात. मात्र अर्ध्या महिलांकडे स्वतःचा मोबाईल नाही. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) अलीकडे व्यापक मॉडय़ुलर सर्वेक्षण – दूरसंचार 2025 ची आकडेवारी जारी केली. यामध्ये जानेवारी 2025 ते मार्च 2025 चा डेटा समाविष्ट केला आहे. एनएसओच्या आकडेवारीनुसार, ग्रामीण भागात 15 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या 76.3 टक्के महिला मोबाईल वापरतात. मात्र 48.4 टक्के महिलांकडे स्वतःचा फोन नाही. ग्रामीण भागात 15 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या 89.5 टक्के महिला मोबाईलचा वापर करतात, तर 80.7 टक्के पुरुषांकडे स्वतःचा मोबाईल आहे. यावरून स्त्री- पुरुषदरम्यानचे मोबाईलच्या मालकीचे अंतर समजते. शहराचा विचार केला तर 15 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या 71.8 टक्के महिलांकडे आणि 90 टक्के पुरुषांकडे मोबाईल आहेत.
युवा वर्गामध्येही मोबाईलची व्रेझ दिसून येते. ग्रामीण भागात 15 ते 24 वर्षे वयोगटातील 95.7 टक्के मुली पह्नचा वापर करतात. त्यातील 51.4 टक्के मुलींकडे स्वतःचे पह्न आहेत. याच वयोगटातील 98 टक्के तरुण मोबाईल फोन वापरतात, तर 74.8 टक्के तरुण मुलांकडे स्वतःचा फोन आहे.
इंटरनेट वापरात फरक
ग्रामीण आणि शहरी भागातील इंटरनेट वापरामध्ये अंतर दिसून येतंय. शहरी भागात 15 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या 70 टक्के महिला इंटरनेटचा वापर करतात, तर ग्रामीण भागातील 57.6 टक्के महिला इंटरनेट वापरतात.