
स्टेट बँकेच्या ग्राहकांना यापुढे रात्री एटीएममधून पैसे काढताना मोबाईल जवळ ठेवावा लागणार आहे. रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत दहा हजारांपेक्षा अधिक रक्कम एटीएममधून काढायची असेल तर मोबाईलवर येणारा ओटीपी नोंदवावा लागणार आहे. ओटीपी दिल्यानंतरच ग्राहकांना पैसे मिळणार आहेत. १ जानेवारीपासून याची संपूर्ण देशभरात अंमलबजावणी होणार आहे.























































