
मोबाईल रिचार्ज आणि इंटरनेट आणखी महाग होणार आहे. यावर्षाच्या अखेरपर्यंत मोबाईल कंपन्या रिचार्ज प्लानमध्ये 10 ते 12 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शक्यता आहे. कंपन्यांनी मोबाईल रिचार्ज महाग केल्यास फोनवर बोलणे महाग होईल. मे महिन्यात अॅक्टिव सब्सक्रायबरमध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. हा पाचवा महिना आहे, ज्यामध्ये लागोपाठ नवीन युजर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे टेलिकॉम कंपन्यांची टॅरिफ वाढवण्याची शक्यता वाढली आहे.
गेल्या वर्षी जुलै 2024 मध्ये टेलिकॉम कंपन्यांनी मोबाइल रिचार्जच्या किमतीत वाढ केली होती. त्या वेळी मोबाइल रिचार्जच्या बेस प्लानमध्ये 11 ते 23 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर जुलै आणि नोव्हेंबर महिन्यात 2.1 कोटी युजर्स कमी झाले होते. टेरिफ वाढीत प्लानमध्ये मिळणार डेटा कमी केला जाऊ शकतो. यामुळे डेटा पॅक खरेदी करण्यासाठी ग्राहकांना भाग पाडले जाऊ शकते. मे महिन्यात अॅक्टिव युजर्सच्या संख्येत 29 लाख नवीन अॅक्टिव्ह युजर्स जोडले आहेत. ही संख्या आता 108 कोटी झाली आहे.
टेलिकॉम मार्केटमधील रिलायन्स जिओने मे 2025 मध्ये एकूण 55 लाख अॅक्टिव्ह युजर्स जोडले आहेत. यामुळे अॅक्टिव्ह युजर्स बेसमध्ये 150 बेसिस पॉइंट्सची वाढ झाली आहे. हे 53 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. भारती एअरटेलने 13 लाख अॅक्टिव्ह सब्सक्रायबर्स जोडले आहेत. आता कंपनीकडे 36 टक्के अॅक्टिव्ह सब्सक्रायबर्स आहेत.
टेलिकॉम कंपन्या रिचार्ज प्लानच्या किंमतीत किती वाढ करणार आहेत, हे नंतर स्पष्ट होईल. परंतु, डेटा स्पीड, टाइम स्लॉट आणि डेटा युजेसच्या आधारावर वेगवेगळे प्लान आणले जातील. कमी डेटा वापरणारे, रात्री उशिरापर्यंत डेटाचा वापर करणाऱ्यांसाठी वेगळे दर आकारले जातील. याचाच अर्थ टेलिकॉम कंपन्या डेटा प्लानसाठी जास्त पैसे आकारले जातील. 5जी प्लान आणि 4जी प्लानसाठी सुद्धा वेगवेगळे दर आकारले जाऊ शकतात.