पुण्यात रस्ताने जाणाऱ्या तरूणाचा मोबाईल हिसकाविला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रस्त्याने मोबाइलवर बोलत जाणाऱ्या तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना बुधवारी रात्री 7.45 वाजण्याच्या सुमारास चंदननगरमधील मिओ प्लाझा सोसायटीच्या समोरील रस्त्यावर घडली. अंकुर त्यागी (वय 39, रा.खराडी) यांनी चंदनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे.

बुधवारी रात्री 7.45 वाजण्याच्या सुमारास त्यागी सोसायटी समोरील रस्त्यावर चालत होते. त्यावेळी ते फोनवर बोलत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावला. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र, चोरट्यांनी पळ काढला.

तरूणावर चाकूने वार करून मोबाईल हिसकावला
मोटारीतून आलेल्या चोरट्यांनी पायी चालत असलेल्या तरूणावर चाकूने वार करत त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून नेला आहे. याप्रकरणी सचिन प्रभाकर काकडे (वय 29,रा. सिद्धार्थनगर बावधन) यांनी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सचिन काकडे हे पाषाणगावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून पायी जात होते. त्यावेळी मोटारीतून आलेल्या आरोपींपैकी एकाने चाकूने वार करत त्यांच्या मोबाईल हिसकावला. उपचार घेतल्यानंतर सचिन यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.