मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

478

नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोबाईल चोरणाऱ्या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल जप्त केला आहे. नितीन शिवाजी धोत्रे (वय 24, रा.नाधनगर, पाथर्डी, नगर) असे आरोपीचे नाव असून त्याचा साथीदार संदीप झिंजुर्ड फरार झाला आहे.

06 ऑक्टोबर रोजी विशाल बाळासाहेब टेके (वय 25, रा.माणीकदोंडी रोड,पाथर्डी)  यांचा10,000 रुपये किंमतीचा रेडमीचा मोबाईल अज्ञात चोरटयाने चोरल्याची तक्रार दाखल केली होती. याबाबत पाथर्डी पेालिसांनी गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक रबीद्र कर्डीले, संतोष लोढे,रवी सोनटक्के, मेघराज कोल्हे, प्रकाश वाघ, रवींद्र घुंगासे, विनोद मासाळकर यांनी पाथर्डी येथे जावुन शेवगांव रोड,पाथर्डी येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता नितीन धोत्रे नाव असल्याचे त्याने सांगितले. पोलिसी खाक्या दाखविताच साथीदार संदीप झिंजुर्ड याच्यासह मोबाईल चोरल्याची कबुली दिली. संदीप झिंजुर्ड फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या