मोदानीचा धारावी पुनर्विकास प्रकल्प हा मेगास्पॅम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवताना पेंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगपती अदानी यांच्याशी हातमिळवणी केली आहे, हे उघडपणे दिसत आहे. धारावी पुनर्विकासाची निविदा परदेशी विकासकाने पारदर्शी पद्धतीने जिंकल्यावरही ती निविदा प्रक्रिया अदानीसाठी रद्द करण्यात आली. एकटय़ा अदानीला निविदा प्रक्रियेत घेऊन धारावी प्रकल्प अदानीच्या घशात घालण्यात आला आहे. टीडीआरची प्रचंड सूट दिल्यामुळे त्याचे परिणाम एकटय़ा धारावीकरांना भोगावे लागणार नाहीत तर मुंबईतील विकासक आणि श्रीमंत आणि गरीब अशा सर्वांना भोगावे लागणार आहेत. मोदानीचा प्रस्तावित धारावी पुनर्विकास प्रकल्प हा उघड उघड मेगास्पॅम आहे, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे.