गुजराती नरेंद्र मोदी बनारस छोडो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, वाराणसी

गुजरातमध्ये उत्तर हिंदुस्थानींवर होत असलेल्या हल्ल्यांचे पडसाद आता उत्तर प्रदेशात उमटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये ‘गुजराती नरेंद्र मोदी बनारस छोडो’ असे पोस्टर्स लागले आहेत. यामुळे भाजपात खळबळ उडाली आहे.

‘यूपी-बिहार एकता मंच’ या नव्याने स्थापन झालेल्या गटाने पोस्टर्स लावले आहेत. शहरभर पंतप्रधान मोदींविरुद्ध पोस्टरबाजी करून घोषणाही दिल्या जात आहेत. या मंचचे अध्यक्ष काशीनाथ कुन्वर हे आहेत. या पोस्टरवरील मजकुरात गुजराती आणि महाराष्ट्रातील लोकांनी एका आठवडय़ात वाराणसी सोडून जावे. नाहीतर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.

मोदींनी गुजरातमध्ये निवडणूक लढवावी

वाराणसीच्या लोकांनी पंतप्रधान मोदींना निवडून दिले. पण त्यांच्या गुजरातमध्ये उत्तर हिंदुस्थानींवर हल्ले होत आहेत. हाकलून दिले जात असताना पंतप्रधान मोदी मात्र काहीच का बोलत नाहीत? असा सवाल कुन्वर यांनी केला आहे. 2019 ला मोदींनी वाराणसी नाही तर गुजरातमधून निवडणूक लढवावी असे त्यांनी सांगितले.