संपूर्ण जगाची नजर असलेला कार्यक्रम Howdy Modi आहे तरी काय आहे?

1272

अमेरिकेत 22 सप्टेंबर रोजी Howdy Modi या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेतील हा आतापर्यंत सर्वात मोठा कार्यक्रम आहे. देश विदेशात या कार्यक्रमाची चर्चा आहे.

अमेरिकेत पंतप्रधान मोदींचा मोठा कार्यक्रम होणार आहे म्हणून पाकिस्तानीच्या पोटात दुखु लागले आहे. म्हणून त्यांनी पंतप्रधान मोदींना एअरस्पेस देण्यास नकार दिला होता. या कार्यक्रमासाठी मोदी शनिवारी अमेरिकेला रवाना होतील.

काय आहे Howdy Modi ?
22 सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या ह्युस्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात अमेरिकेत राहणारे मूळचे 50 हजार हिंदुस्थानी हजर राहणार आहेत. अमेरिकेत पोपच्या कार्यक्रमानंतर मोदींचा हा सर्वात मोठा कार्यक्रम असणार आहे.

दक्षिण अमेरिकेत Howdy हा शब्द प्रचलित आहे. How do you do याचे संक्षिप्त रुप म्हणजे howdy असा होतो. त्यात मोदी येणार आहेत म्हणून Howdy modi म्हणजेच मोदी कसे आहात असे या कार्यक्रमाचे नाव ठरवण्यात आले आहे.
हा कार्यक्रम हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रासाठी या कार्यक्रमाचे महत्त्व अधिकच आहे. हिंदुस्थानमध्ये इंधन क्षेत्रातील उद्योगांसाठी मोदी मोठ्या कंपनींशी बैठक घेऊ शकतात.
२019 वर्षातील हा सर्वात मोठा कार्यक्रम ठरणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्पही सहभागी होतील अशी माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे. हिंदुस्थान आणि अमेरिकेच्या मैत्रीमधील हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष ट्रम्पसह युएस काँग्रेसचे सदस्य, राज्यपालांचे एक शिष्टमंडळ आणि अनेक महापौर उपस्थित राहतील.

आपली प्रतिक्रिया द्या