मोहित कंबोज यांच्या अडचणीत वाढ, सांताक्रूझ येथील घरात आढळले बेकायदा बांधकाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mohit kamboj bmc unauthorized construction

मुंबई महानगर पालिकेने आज केलेल्या तपासणीत भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या सांताक्रूझ येथील घरात बेकायदा बांधकाम आढळले आहे. पालिकेच्या एच/पश्चिम कार्यालयाकडून आज दिवसभर त्यांच्या घराची तपासणी करण्यात आली. यामध्ये घरात काही ठिकाणी बेकायदा बांधकाम आढळल्याचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांनी सांगितले. दिवसभराच्या तपासणीनंतर निश्चित किती बेकायदा बांधकाम हे समोर येणार असून पुढील कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.