मंकीपॉक्सवर सावध आणि सतर्क राहणे हाच उपाय

सध्या आपल्याकडे कोरोनाची परिस्थिती ताब्यात असली तरी मंकीपॉक्स हा आजार जगभरात डोके वर काढताना दिसतो आहे. या विषाणूने जगात कहर केला आहे. आपल्याकडे केरळमध्ये या आजाराचा पहिला रुग्ण आढळला  आहे. हा आजार माकडामधून पसरत आहे. त्यामुळे या आजाराला मंकीपॉक्स नाव दिले गेले आहे. युरोप आणि उत्तर अमेरिकेत या आजाराची अनेक प्रकरणे आढळली आहेत.

आजारामागची काही तथ्ये जाणून घेऊया.

  •  मंकीपॉक्स हा दुर्मिळ संसर्गजन्य आजार आहे. 1958 मध्ये संशोधनासाठी ठेवलेल्या माकडामधून याचा प्रथम शोध लागला. तर मंकीपॉक्सची पहिली माणसाची केस 1970 मध्ये नोंदवली गेली.
  • हा आजार संक्रमित प्राण्याने घेतलेल्या चाव्यामुळे किंवा त्याच्या शरीरातील घटकांशी संपर्क झाल्यास पसरतो. उंदरांमुळेही हा रोग पसरतो. तसेच नीट न शिजवलेल्या मांसाहारामुळेही हा रोग पसरू शकतो.
  • आरोग्यतज्ञांच्या मते हा संसर्ग लैंगिक संपर्कामुळेही होऊ शकतो.
  • ताप, स्नायू दुखणे, थंडी वाजणे ही मंकीपॉक्सची सामान्य लक्षणे आहेत.
  • मंकीपॉक्सवर सध्या कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. सावध आणि सतर्क राहणे हाच यावर उपाय आहे.

* मंकीपॉक्सचा काळ साधारणत 6 ते 13 दिवसांचा असतो. पण जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार हा कालावधी 5 ते 21 दिवसांचाही असू शकतो.

मंकीपॉक्सची लक्षणे –

शरीरावर गडद लाल पुरळ , स्नायूत होणाऱ्या वेदना, तीव्र डोकेदुखी, सर्दी, न्युमोनिया, शारीरिक थकवा जाणवणे, खूप जास्त ताप, शरीरावर सूज, सतत थकल्यासारखे वाटणे.

उपाय –

स्वत:ची काळजी घेणे हाच यावर उपाय आहे. सतत हात धूत राहणे, मास्क्चा वापर करणे, घरात स्वच्छता राखणे, सामाजिक अंतर राखणे हेच यावर उपाय आहेत.