मुंबईकरांनो, छाता निकालो! कुठल्याही क्षणी पाऊस बरसणार

taxi in mumbai rain

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईकरांची पावसाची प्रतीक्षा आता संपणार असून आज पाऊस अलिबागमध्ये दाखल झाला. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी तो मुंबईवर बरसेल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. गेल्या 48 तासांमध्ये पावसाने दक्षिण हिंदुस्थानात जोर धरला असून त्याला कोणताही अडथळा नसल्यामुळे तो पुढे सरकत आहे.

मुंबईत आतापर्यंत हलक्या सरी कोसळल्या आहेत. मात्र, जून महिना संपत आला तरी मुसळधार पाऊस अनुभवायला मिळालेला नाही. राज्यातील इतर भागांत मात्र मध्यम तर काही भागांत दमदार हजेरी लावली आहे. मात्र, मुंबईकर अजूनही पावसाची वाट पाहत आहे. या आठवडय़ात मुंबईकर चांगला पाऊस अनुभवतील, असा स्कायमेटचा अंदाज आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ात देशभरात पावसाचे आगमन होते. त्यानंतरही हळूहळू देशभरात स्थिरावतो. मात्र, या वर्षी पाऊस तब्बल 17 दिवस उशिराने येत आहे. त्यामुळे शहरांबरोबर ग्रामीण भागांतले लोकही पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.