राज्यात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून, पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गात 23 जुलै सायंकाळी 5:30 ते 24 जुलै रात्री 8:30 पर्यंत 3.6 ते 4.3 मीटर उंच लाटांची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही यलो अलर्ट आहे.

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, यवतमाळ, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. या काळात वादळी वारेही वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे.