
सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता नद्यांमध्ये पाणी सोडले जात असल्यामुळे आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प न उभारण्यात हलगर्जीपणा होत असल्यामुळे राज्यातील 56 नद्या प्रदूषित झाल्या आहेत, अशी कबुली देत या नद्यांचे वर्गीकरण करून विभागनिहाय बैठका घेतल्या जातील आणि या नद्या पुनर्जीवित करण्यासाठी प्रकल्प सुरू केले जाईल, अशी माहिती पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील नद्यांचे जलप्रदूषण रोखण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत, यासंदर्भात रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रश्न विचारले, त्याला मुंडे यांनी उत्तर दिले.