राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 500 च्या वर; मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतली आकडेवारी धडकी भरवणारी

राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 500 च्या वर गेली आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. असे असले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे. ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात कोरोनासाठी वेगळ्या वॉर्डची सुविधा करण्यात आली आहे.

राज्यात एकूण 87 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 85 RT-PCR तर दोन रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. बुधवारी कोरोनाचे चार रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तीन बरे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

ठाण्यात पाच रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या ही 108 वर गेली आहे. त्यापैकी 16 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर 13 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तीन रुग्णांवर कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 32 रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं आढळल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.