
रशिया-युक्रेन युद्धाला 24 फेब्रुवारी रोजी तीन वर्षे पूर्ण झाली असून आता चौथे वर्ष सुरू झाले आहे. 24 फेब्रुवारी2022 मध्ये या दोन्ही देशांमधील युद्ध पेटले होते. गेल्या तीन वर्षात युद्ध थांबवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, अद्याप त्यात यश आलेले नाही. या युद्धाने चौथ्या वर्षात प्रवेश करतानाच रशियाची राजधानी मास्कोमध्ये मोठा स्फोट झाला असून त्यात दोन ठार झाले असून दोन जखमी झाले आहे. या युद्धाला तीन वर्षे पूर्ण होण्याच्या दिवशीच हा स्फोट झाल्याने त्याला महत्त्व आले आहे.
मॉस्कोच्या सॅव्हेलोव्स्की रेल्वे स्थानकाबाहेर झालेल्या स्फोटात दोन जण ठार झाले. रशिया-युक्रेन युद्धाचे चौथे वर्ष सुरू होताना हा स्फोट झाला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे ज्यामध्ये एक व्यक्ती पोलिसांच्या गाडीजवळ स्फोटके ठेवताना दिसत आहे. मॉस्कोच्या सॅव्हेलोव्स्की रेल्वे स्थानकाबाहेर मंगळवारी मोठा स्फोट झाला. त्यात दोन जण ठार आणि दोन पोलिस अधिकारी जखमी झाले. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. अद्याप स्फोटाचे कारण समजलले नाही.
रशियन वृत्तसंस्थांच्या मते, पोलिसांनी मंगळवारी सकाळी मॉस्को रेल्वे स्थानकाबाहेर स्फोट झाल्याचे सांगितले. मृतांमध्ये दोन जणांपैकी एक पोलिस अधिकारी आहे. दुसरा संशयित आहे. पोलिसांना संशय आहे की तोच स्फोटके ठेवणारा व्यक्ती असावा. तपासादरम्यान, पोलिसांनी स्फोटस्थळाचे व्हिडिओ फुटेज तपासले. मध्य मॉस्कोमधील सॅव्हेलोव्स्की स्टेशनच्या बाहेर एक संशयित दिसला. संशयित पोलिसांच्या गाडीजवळ स्फोटक यंत्र ठेवताना दिसत आहे.
रशिया-युक्रेन युद्धाच्या चार वर्षांच्या वर्धापनदिनानिमित्त युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांनी एक्सवर लिहिले, आजच्याच दिवशी बरोबर चार वर्षांपूर्वी, पुतिन यांनी युक्रेन ताब्यात घेण्यासाठी मोहीम सुरू केली. हे आपल्या सूडाची आणि युक्रेनच्या संघर्षाची कहाणी सांगते. या शब्दांमागे आपले लाखो लोक, अफाट धैर्य, अथक परिश्रम, सहनशक्ती आणि तीन वर्षे युक्रेनने केलेला दीर्घ प्रवास आहे.
झेलेन्स्की म्हणाले की, आक्रमणाची सुरुवात लक्षात ठेवत आणि सध्याच्या परिस्थितीवर विचार करून, आपल्याला असे म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे की, आपण आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले आहे, आपण आपले राष्ट्रीयत्व गमावलेले नाही. पुतिन यांनी त्यांचे ध्येय साध्य केलेले नाही. त्यांना युक्रेनियन लोकांमध्ये फूट पाडता आलेली नाही. त्यांनी हे युद्ध जिंकलेले नाही. आम्ही युक्रेनला सुरक्षित ठेवले आहे आणि आम्ही शांतता आणि न्यायासाठी शक्य ते सर्व करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
































































