3 लाख 96 हजार दिव्यांग मतदार, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 67 हजार 673 मतदार

460

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात एकूण 3 लाख 96 हजार 673 दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर विशेष सुविधा पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 67 हजार 279 दिव्यांग मतदारांची नोंद झाली असून त्याखालोखाल कोल्हापूरमध्ये 24 हजार 197 व सांगलीत 21 हजार 742 जणांनी दिव्यांग म्हणून नोंदणी केली आहे. हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी 2329 जणांनी दिव्यांग असल्याची नोंद केली आहे.

यंदाचे वर्ष हे सुलभ निवडणूक (ऍक्सेसेबल इलेक्शन) म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दिव्यांग नागरिकांनी मतदार म्हणून नोंदणी करावी यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. ‘पीडब्ल्यूडी’ ऍपद्वारे दिव्यांगांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

मतदान केंद्रांवर व्हिलचेअर,  रॅम्पची व्यवस्था

दिव्यांगांना मतदान करताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मतदान केंद्रांवर व्हिलचेअरची सुविधा. तसेच केंद्रापर्यंत सुलभपणे जाण्यासाठी रॅम्प उभारण्यात येतील. दिव्यांग मतदारांना सोयीचे व्हावे म्हणून पहिल्या अथवा दुसर्‍या मजल्यावरील सुमारे 5400 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या