
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील पत्तन येथे पोलीस पथकावर ग्रेनेड हल्ला करणाऱ्या एका दहशतवाद्याला सुरक्षादलाने अवघ्या 24 तासात यमसदनी पाठवले. . ‘मोस्ट वाँटेड’ असलेल्या तेहरिक-उल-मुजाहिदीनचा हा दहशतवादी पुलवामा येथील चकमकीत ठार झाला. बुधवारी पोलीस पथकावर ग्रेनेडने हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी एकाला यापूर्वीच अटक करण्यात आली होती.
Jammu and Kashmir: A Tehreek-ul-Mujahideen (TuM) terrorist killed in Pulwama; he was wanted in grenade attack on a police party in Baramulla’s Pattan. Arms and ammunition recovered.
— ANI (@ANI) October 18, 2018
पुलवामा येथे मारल्या गेलेल्या या दहशतवाद्याकडे मोठ्याप्रमाणात शस्त्रास्त्राचा साठा आणि दारुगोळा सापडला. सुरक्षादलाचे हे मोठे यश असल्याचे सांगण्यात येते. बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी दहा दहशतवाद्यांनी नाकाबंदी करुन तपासणी करीत असलेल्या पोलिसांच्या पथकावर ग्रेनेड हल्ला केला होता. यामध्ये ३ पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यानंतर दहशतवाद्यांचा पाठलाग करत एकाला अटक करण्यात सुरक्षादलाला यश आले होते.


























































