तगडी बॅटरी अन् जबरदस्त कॅमेरा, Motorola ने लॉन्च केला बजेट स्मार्टफोन

फेस्टीव्ह सिझन पाहता अनेक मोबाईल कंपन्या आपले स्मार्टफोन लॉन्च करत आहेत. मोटोरोला (Motorola) कंपनीने देखील आपला Moto E40 हा स्मार्टफोन हिंदुस्थानमध्ये लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 10 हजारांहून कमी असून 17 ऑक्टोबरपासून हा स्मार्टफोन ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

मोटोरोला (Motorola) कंपनीने गेल्या आठवड्यामध्ये Moto E40 या बजेट स्मार्टफोनची घोषणा केली होती. या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात दिलेली तगडी बॅटरी आणि जबरदस्त कॅमेरा. कंपनीने यात 5000mAH ची बॅटरी दिली असून 48MP चा कॅमेरा आणि मोठी स्क्रिन दिली आहे.

moto-e40-new

वैशिष्ट्य –

– 6.5 इंचाचा IPS LCD डिस्प्ले पॅनल (रिझोल्यूशन 720 x 1600 पिक्सल (HD+))
– 3.5 मिमी हेडफोन जॅक
– माइक्रोएसडी कार्ड स्लॉट
– यूएसबी टाइप-सी पोर्ट
– रियर-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर

कंपनीने या फोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज दिली आहे. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन Android 11 वर चालतो.

कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाले तर कंपनीने यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. 48MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चा मायक्रो स्नॅपर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर यात देण्यात आली आहे. तसेच सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा यात देण्यात आला आहे.

moto-e40-new1

कंपनीने यात कनेक्टीव्हिटीसाठी डिवाइस डुअल-सिम, 4जी, वायफाय, ब्लूटूथ आणि जीएनएसएस सेवा दिल्या आहेत. हा फोन कार्बन ग्रे आणि पिंक क्ले रंगामध्ये उपलब्ध आहे. हिंदुस्थानमध्ये या स्मार्टफोनची किंमत 9 हजार 499 रुपये एवढी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या