उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोटारसायकल रॅलीचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या २७ जुलै या जन्मदिनी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मोटार सायकल रॅलीत हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन लोकनेते माजी आमदार विजयराज शिंदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.

शनिवार २७ जुलै रोजी सकाळी ठिक ९ वाजता शिवालय या विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून रॅलीस प्रारंभ होणार आहे. संगम चौक, जयस्तंभ चौक, तेथून बाजार गल्लीने भगवान महावीर चौकातून सराफा गल्ली, तेथून संभाजी नगरच्या कमानी जवळून कारंजा चौकातून एडेड चौक, मोठी देवी पासून त्रिशरण चौक, चिखली रोड पेट्रोल पंपा समोरून स्टेट बँक ऑफ इंडिया सुंदरखेड शाखेपासून परत येऊन सर्क्युलर रोडने महाराणा प्रताप चौकातून चिंचोले चौक, तेथून धाड नाका तेथून क्षय आरोग्य धाम समोरून एस टी बस स्टॅन्ड तेथून संगम चौकातून शासकीय विश्राम भवना समोरून पाण्याच्या टाकिसमोरून शिवनेरी चौक, विष्णू वाडी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात आरती करून रॅलीचा समारोप होणार आहे.