मोटरमनने वाचविले प्रवाशाचे प्राण

1168

फास्ट लोकल पकडण्यासाठी जीव धोक्यात घालून रूळ ओलांडणार्‍या एका प्रवाशाचे प्राण मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक दाबल्याने अवघ्या काही सेकंदांच्या फरकाने बचावल्याची घटना रविवारी सकाळी दिवा रेल्वे स्थानकात घडली. जर मोटरमनने वेळीच ब्रेक दाबले नसते तर हा तरुण जागीच चिरडला गेला असता. त्यामुळे काही मिनिटे वाचविण्यासाठी मृत्यूचा शॉर्टकट मारू नका असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

सीएसएमटी ते कसारा लोकलच्या डय़ुटीवर असलेले मोटरमन महेंद्रकुमार चावडा यांना सकाळी 6.55 वा. रिपोर्टिंगची वेळ दिली होती. त्यांना सीएसएमटी ते कसारा ही लोकल डय़ुटी बजावण्यासाठी देण्यात आली. सकाळी 7.45वाजण्याच्या दरम्यान त्यांची लोकल दिवा स्थानकात प्रवेश करीत असताना एका तरुणाने पलीकडच्या फलाटावर आलेली जलद लोकल पकडण्यासाठी धीम्या लोकलमधून उडी मारल्याचे सावध असलेल्या चावडा यांनी पाहिले आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी इमर्जन्सी बेक दाबले. त्यामुळे या तरुणाला काही सेकंदांचा अवधी मिळाला आणि तो थोडक्यात बचावला. त्यांनी जर ब्रेक दाबण्यास जरा जरी उशीर केला असता तर कदाचित लोकल त्या तरुणाच्या अंगावरून गेली असती.

आपली प्रतिक्रिया द्या