
मोटोरोलाने आपला एज 60 प्रो हा स्मार्टफोन हिंदुस्थानात लाँच केला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा फोन वॉटप्रूफ फोन आहे. या फोनमध्ये 6000 एमएएच क्षमतेची बॅटरी, 50 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. 8 जीबी रॅम, 256 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 29,999 रुपये आणि 12 जीबी रॅम, 256 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 33,999 रुपये ठेवली आहे. या फोनची प्री-ऑर्डर सुरू करण्यात आली आहे. फोनची विक्री 7 मेपासून सुरू होणार आहे.