मध्य प्रदेशात तीन मजली लॉज कोसळले, दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशात अनुपपूर जिल्ह्यातील कोतमा बसस्थानकाजवळ शनिवारी रात्री तीन मजली अग्रवाल लॉज कोसळले. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला, तर 3 जण जखमी झाले आहेत. त्यांना शहडोल मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले आहे. उशिरापर्यंत अनेक लोक ढिगाऱयाखाली दबले आहेत. या दुर्घटनेचे सीसीटीक्ही फुटेजही समोर आले आहे, ज्यात संपूर्ण इमारत कोसळताना दिसत आहे.

मृतांची ओळख हनुमान दीन यादव (55) आणि राम कृपाल यादव (40) अशी झाली आहे. दोघेही चौथ्या मजल्याकर काम करत होते, तेव्हा हा अपघात घडला. त्यांच्या तोंडातून रक्त येत होते. त्यांची हाडे मोडली होती. अपघाताची माहिती मिळताच राज्यमंत्री दिलीप जयस्वाल, जिल्हाधिकारी हर्षल पंचोली आणि एसपी मोती उर रहमान घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी 10-12 रुग्णवाहिका उपस्थित आहेत. या अपघाताकर मुख्यमंत्री मोहन यादक यांनी दु:ख व्यक्त करत स्वत: संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवून आहेत. सध्या बचाककार्य ही प्राथमिकता असून, चौकशी नंतर केली जाईल. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ, स्थानिक कोळसा खाणीतील तीन आणि भिलाई येथून आलेल्या टीम बचावकार्यात गुंतल्या आहेत. एसडीआरएफ आणि प्रशासनाचे सुमारे 100 लोकांचे पथक ढिगारा हटवण्यात गुंतले आहे. लॉज कोसळल्याने आजूबाजूची अनेक दुकानेही त्याच्या कचाटय़ात सापडली आहेत.