राज्यातील दुष्काळाच्या प्रश्‍नावर खा. सातवांनी वेधले केंद्राचे लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

राज्यातील दुष्काळाच्या प्रश्‍नावर लोकसभेत नियम 377 अंतर्गत खा. राजीव सातव यांनी लक्ष वेधले असून, दुष्काळजन्य परिस्थिती वर सावरण्यासाठी उपाय योजनासंदर्भात प्रश्‍न उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंगोली लोकसभा क्षेत्रातील सर्वच भागात दुष्काळी परिस्थीती असतांना बहुतांश तालुके दुष्काळाच्या छायेत असतांना देखील दुष्काळातुन वगळण्यात आले आहेत. यामुळे शेतकर्‍यांमध्ये तिव्र संतापाची लाट उसळली असुन, संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना मदतीची अपेक्षा आहे. अशावेळी या परिस्थीतीवर मात करण्यासाठी दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना केंद्र सरकार कडून प्रति हेक्टर 50 हजार रूपये आर्थिक मदत जाहीर करावी व शेतकर्‍यांना विना व्याज कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी खा.सातव यांनी केली.