एमपीएससी पेपरफुटीची व्याप्ती वाढणार, 120 पेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी पोलिसांच्या रडारवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटीची व्याप्ती वाढण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणात आणखी अटकेची कारवाई होऊ शकते असे पोलिसांकडून समजते. या परिक्षेत 120 पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेले काही विद्यार्थी पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

मार्च 2026 ला झालेल्या एमपीएससी परीक्षेच्या 22 जुलैला जाहीर झालेल्या 488 जणांच्या अंतरिम गुणवत्ता यादीत बहुतांश विद्यार्थ्यांना 200 पैकी 120 गुणांपर्यंतच मजल मारता आली होती. तर 120 पेक्षा अधिक गुण मिळवून वरचा क्रमांक मिळवणारे असेही काही विद्यार्थी आहेत ज्यांची अगदी काही महिन्यांपूर्वी झालेल्या इतर स्पर्धा परीक्षांमधील कामगिरी सामान्य होती आणि त्यांचा क्रमांकही हजारांमध्ये होता. हे सगळे परीक्षार्थी सध्या संशयाच्या घेऱ्यात आहेत. या प्रकरणात अटक झालेल्या काwटिल्य अपॅडमीचा संचालक प्रवीण पाटील याने त्याच्या संपका&तील अनेक परीक्षार्थींना प्रश्नांचा संच दिल्याचा संशय आहे. तसेच फुटलेल्या प्रश्नपत्रिका व्हाट्सअॅपवर व्हायरल झाल्याचा तक्रारदार परीक्षार्थीचे म्हणणे आहे.

– प्रवीण पाटील आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अटक करण्यात आलेले अवर सचिव अभिजीत लेंडवे, परीक्षेचे समन्वय व सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते आणि सहाय्यक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे यांच्या बँक खात्यांच्या आर्थिक व्यवहारांची गुन्हे शाखेकडून तपासणी सुरू असून त्यातूनही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.