ऐसे तुकर तुकर का देखत हो? भन्नाट डायलाॅगच्या जुगलबंदीसह आमिर खानच्या ‘पीके’ चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला

 

नाम कुछ नहीं हैं हमार, लेकिन पता नहीं काहे सब लोग हमका पीके -पीके बुलावा हैं, हमरा गोला पर लोग झूठ नहीं बोलता हैं .. हे डायलाॅग तुम्हाला आठवताहेत का? 2014 साली आलेल्या आमिर खानच्या पीके या चित्रपटाने चाहत्यांना चांगलीच भूरळ घातली. या चित्रपटातील आमिरचे पोस्टर हे खूपच चर्चेचा विषय बनले होते. पीके चित्रपटाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.

आमिर खानचा पीके हा चित्रपट आपल्या सर्वांच्यांच स्मरणात आहे. ‘पीके’ च्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या वृत्तानुसार, आमिर खान आणि राजकुमार हिरानी हे पीके २ चा सिक्वेल बनवण्याचा विचार करत आहेत. यातील सर्वात आश्चर्यचकीत करणारी बाब म्हणजे, या चित्रपटामध्ये यावेळी रणबीर कपूर एलियनची भूमिका साकारताना दिसू शकतो. ‘पीके’च्या शेवटच्या शॉटमध्ये रणबीरचा एन्ट्री सीन आठवतोय का? तेच कथानक आता पुढे सिक्वेल म्हणून आपल्या समोर येणार आहे. या चित्रपटाच्या पटकथेवर कामही सुरु झाले असून, आता फक्त या चित्रपटाची औपचारीक घोषणा बाकी आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यास सज्ज झाला आहे. यावेळी तो ‘सितारे जमीन पर’ हा कॉमेडी-ड्रामा चित्रपट घेऊन येत आहे. येत्या 20 जूनला सितारे जमीन पर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मुलांच्या भावविश्वावर आधारीत असून, या चित्रपटाची मुख्य पार्श्वभूमी खेळ ही आहे. विनोदासह भावभावनांची गुंफण या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे.

‘सितारे जमीन पर’ नंतर आमिर खान आणखी एका मोठ्या प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहे. आमिर दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकवर काम करणार आहे. हिंदुस्थानच्या चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित असेल. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे ही बायोपिक राजकुमार हिरानी स्वतः दिग्दर्शित करणार आहेत.