‘मृणालताई नाट्य करंडक’चे काऊंटडाऊन सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी रंगभूमीवर नवोदित कलाकारांना त्यांची प्रतिभा सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ‘मृणालताई नाटय़ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा’ यंदा नवव्या वर्षात पदार्पण करत आहे. यंदा 4 ते 6 डिसेंबरदरम्यान एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी, केशव गोरे स्मारक ट्रस्ट, गोरेगाव येथे रंगणार आहे तर अंतिम फेरी 16 डिसेंबरला यशवंत नाटय़ मंदिर, माटुंगा येथे संपन्न होईल.

गौरव जनसेवा ट्रस्ट आणि सोहम थिएटर आयोजित आणि केशव गोरे स्मारक ट्रस्ट यांच्या सहकार्याने आयोजित या स्पर्धेमुळे राज्यातील विविध नाटय़संस्थांना आपली कलात्मक क्षमता व नवीन विचार सादर करण्याची संधी मिळणार आहे. विजेत्यांसाठी प्रथम पारितोषिक 31 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 21 हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक 11 हजार रुपये आहे, अशी माहिती गौरव जनसेवा ट्रस्टचे संस्थापक सुदेश सावंत यांनी दिली.