धोनीचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम, ‘हिटमॅन’ रोहितला केले ओव्हरटेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हैदराबाद

हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या एक दिवसीय सामन्यात एम.एस. धोनीने नवा माईलस्टोन गाठला. धोनीने हिंदुस्थानकडून एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. धोनीने हिटमॅन रोहित शर्माच्या विक्रमाला ओव्हरटेक करत हा विक्रम केला. धोनीच्या नावावर एक दिवसीय क्रिकेटमध्ये 216 षटकारांची नोंद झाली आहे, तर रोहितच्या नावावर 215 षटकारांची नोंद आहे. पहिल्या सामन्यात रोहित 37 धावांवर बाद झाला. दरम्यान, दोघेही सध्या एक दिवसीय क्रिकेटमधील कायम सदस्य असल्याने त्यांच्यातील षटकारांची जुगलबंदी आपल्याला पुढेही पाहायला मिळेल.

हिंदुस्थानकडून वन डेमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे खेळाडू
1. एम.एस. धोनी – 216 षटकार
2. रोहित शर्मा – 215 षटकार
3. सचिन तेंडुलकर – 195 षटकार
4. सौरव गांगुली – 189 षटकार
5. युवराज सिंह – 153 षटकार
6. विरेंद्र सेहवाग – 131 षटकार