मुलुंडमध्ये सीलिंग कोसळून दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुलुंड पूर्व नाने पाडा येथील मोती छाया इमारतीमध्ये सीलिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. देवशंकर शुक्ला (93) आणि आरखीबेन शुक्ला (87) अशी मृतांची नावे आहेत.

‘ग्राऊंड प्लस टू’ इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सीलिंग कोसळले. यामध्ये जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्याआधीच दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दरम्यान, 25 ते 30 वर्षांपूर्वीचे बांधकाम असलेल्या या इमारतीमधील धोकादायक बांधकामाबाबत 351 ची नोटीस बजावण्यात आली होती, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.