मुलुंड डंपिंग ग्राऊंड अजूनही सुरूच! 1 ऑक्टोबरपासून बंद केल्याचा दावा फोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुलुंड डंपिंग ग्राऊंड 1 ऑक्टोबरपासून बंद होत असल्याचे पालिका प्रशासनाने जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात या ग्राऊंडवर अजूनही दररोज मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. कचऱ्यावर प्रक्रियेसाठी कंत्राटदाराला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्याप आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या नसल्याने ‘कचरा प्रक्रिया’ रखडली असल्याचे प्रशासनाने मंगळवारी स्थायी समितीत कबूल केले. यामुळे अजूनही मुलुंडकरांची कचऱ्याच्या दुर्गंधीतून सुटका झालेली नाही.

कचऱ्याच्या प्रचंड दुर्गंधीमुळे मुलुंडकरांचे आरोग्य धोक्यात आल्यामुळे मुलुंड डंपिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. या डंपिंग ग्राऊंडकर आग लागण्याचे प्रकारही अनेक केळा घडले आहेत. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेऊन मुलुंड डंपिंग ग्राऊंड 1 ऑक्टोबर 2018 पासून बंद करण्याचे आदेश दिले. पालिका प्रशासनाने तसे जाहीरही केले, मात्र हे डंपिंग ग्राऊंड अजूनही सुरूच असल्याची बाब स्थायी समितीत भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी निदर्शनास आणून दिली. त्यावेळी प्रशासनाने परवानग्या मिळाल्या नसल्याने कचरा प्रक्रिया सुरू झाली नसल्याचे सांगितले.

कचरा साठवणुकीची क्षमता संपत आली

  • 1968 मध्ये सुरू झालेल्या डंपिंग ग्राऊंडकर सद्यस्थितीत तब्बल 1500 मेट्रिक टन कचरा टाकला जात होता. क्षमता संपत आल्याने हे डंपिंग ग्राऊंड बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
  • या ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या 1500 मेट्रिक टन कचऱ्यापैकी एक हजार मेट्रिक टन कचरा देवनार डंपिंग ग्राऊंडवर तर 500 मेट्रिक टन कचरा कांजूर डंपिंग ग्राऊंडकर टाकण्यात येणार आहे.
  • कचरा विल्हेवाटीसाठी 650 कोटींचा खर्च
    24 हेक्टर परिसरात असलेल्या मुलुंड डंपिंग ग्राऊंडकर गेल्या अनेक वर्षांपासून कचरा टाकण्यात येत असल्यामुळे सध्या या ठिकाणी 70 लाख मेट्रिक टनांवर कचरा जमा झाला आहे. त्यामुळे कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी तब्बल सहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. यासाठी पालिकेने 650 कोटींचे कंत्राटही दिले आहे.