
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबईतील कफ परेड येथे एकाच कुटुंबातील तिघांनी गळफास घेऊन आत्महत्याचे केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. कफ परेड येथील बधवार पार्क जवळील मच्छीमार कॉलनीमध्ये ही घटना घेतली आहे.
प्रविण पटेल (४०), रिना पटेल (३६), प्रभू पटेल (११) अशी या तिघांची नावे आहेत. आई-वडील आणि ११ वर्षाचा मुलगा अशा तिघांनी आत्महत्या केली असून गरीबीला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
























































