
‘मदर इंडिया’, ‘नया दौर’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांतून आपल्या अभिनय आणि नृत्यकौशल्याची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडणाऱ्या बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री कुमकुम यांचे मंगळवारी सकाळी वांद्रे येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्या 86 वर्षांच्या होत्या.
पन्नास ते सत्तरीच्या दशकात लोकप्रिय ठरलेल्या या अभिनेत्रीचे खरे नाव झैबुनिसा. मूळच्या त्या बिहारमधील हुसेनाबादच्या. परंतु बॉलीवूडमध्ये ‘कुमकुम’ याच नावाने त्यांना खरी लोकप्रियता मिळवून दिली. 1954 ते 1974 या कालावधीत त्यांनी ‘मिस्टर एक्स इन बॉम्बे’, ‘सन ऑफ इंंडिया’, ‘कोहिनूर’, ‘उजाला’, ‘श्रीमान फंटूश’ अशा तब्बल 115 चित्रपटांत त्यांनी दमदार भूमिका वठवल्या होत्या.
























































