अखिल हिंदुस्थानी बुद्धिबळ स्पर्धेची रंगत

इन्स्टिटय़ूट फॉर चेस एक्सलंट व आयडियल स्पोर्टस् अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर रोजी अखिल हिंदुस्थानी स्तरावर खुली ऑनलाइन मोफत प्रवेशाची 12 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे. मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने होणाऱया स्पर्धेमधील विजेत्या-उपविजेत्यांना एकूण 10 रोख पुरस्कार दिले जाणार आहेत.

ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा 12 वर्षांखालील मुलामुलींसाठी मर्यादित असून विनाशुल्क आहे. स्विस लीग पद्धतीने लीचेस प्लॅटफॉर्मवर 7 साखळी फेऱयांमधील प्रत्येक स्पर्धकाचा सामना 5 मिनिटे वेळेचा राहील. स्पर्धेच्या पंचांचे कामकाज अरेना इंटरनॅशनल मास्टर राजाबाबू गजंगी, इंटरनॅशनल आर्बिटर प्रेम पंडित आदी पाहणार आहेत. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱया स्पर्धकांनी प्रवेशासाठी तसेच अधिक माहितीसाठी मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सेव्रेटरी राजाबाबू गजंगी (9324719299) यांच्याकडे 25 नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधावा.

आपली प्रतिक्रिया द्या