आरटीई प्रवेशासाठी आजपासून अर्ज

आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळेत राखीव असलेल्या 25 टक्के जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी-पालकांना 3 मार्चपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची मुदत 21 मार्चपर्यंत असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक द.गो. जगताप यांनी सांगितले. 25 टक्के शाळा प्रवेशासाठी शाळांना नोंदणी करण्याची मुदत 17 फेब्रुवारीला संपली. यंदा प्रवेशासाठी एकच सोडत काढण्यात येणार असून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याचा कालावधी संपल्यानंतर पुढील वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. आरटीई प्रवेशासाठी मुंबई विभागातील एसएससी बोर्डाच्या 290 तर इतर बोर्डाच्या 62 अशा एकूण 352 शाळांनी नोंदणी केली आहे. तसेच मुंबईत या प्रवेशासाठी पहिलीच्या 5 हजार 981 तर पूर्व प्राथमिकच्या 482 अशा एकूण 6 हजार 463 जागा उपलब्ध आहेत. अर्जासाठी खाली लिंकवर संपर्क साधण्याचा आवाहन करण्यात आले आहे. http://rte25admission.mahashtra.gov.in,  http://student.maharashtra.gov.in

आपली प्रतिक्रिया द्या