
वांद्रे पूर्व कनाकिया पॅलेसजवळील वाल्मीकी नगरजवळ बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास एका घराला लागलेल्या आगीत सहा जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. यात दोन मुलांचा समावेश आहे. जखमींना भाभा आणि शीव रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. वाल्मीकी नगरजवळील एका घराला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण मात्र समजू शकलेले नाही. या आगीत नगमा बानू (45), नसरीन बानू (30), साकरीन बानू (18), नाजिया शेख (22), आलिया शेख (4), आयन शेख (6) हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.






























































