मुंबईकरांसाठी ‘बेस्ट’ बातमी, बेस्ट पासची मुदत वाढवून मिळणार

720

लॉकडाऊनमुळे 22 मार्च ते 7 जूनपर्यंत ज्या प्रवाशांना आपल्या पासआधारे बससेवेचा लाभ घेता आला नाही, त्यांना त्या बसपासचा बुडालेल्या दिवसांची परतफेड म्हणून ‘जेवढे दिवस बुडाले तेवढे दिवस’ त्यांच्या पासांना मुदतवाढ देण्याची अंमलबजावणी उद्या गुरूवार 9 जुलैपासून करण्यात येणार आहे.

‘कोविड-19’ साथीमुळे 22 मार्चपासून देशभर लॉकडाऊन लागू झाल्याने बेस्टने प्रवासी वाहतूकीस प्रतिबंध केला होता. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या बस पासचे वितरण व नुतनीकरणही स्थगित केले होते. 8 जूनपासून संचारबंदी काही प्रमाणात शिथील करण्यात आल्याने बेस्टची सेवाही सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू झाली असून 29 बसपास वितरण नूतनीकरण केंद्रांना गुरूवार 9 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या