बिस्लेरीच्या कामगारांना 10 हजार 700 रुपयांची घसघशीत पगारवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कामगार सेनेने बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कामगारांना ऐतिहासिक वेतन करार करत तब्बल 10 हजार 700 रुपयांची घसघशीत पगारवाढ मिळवून दिली आहे. तीन वर्षांचा हा वेतन करार झाला आहे.

कायम आणि कंत्राटी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी कोविडकवच पॉलिसी अंतर्गत प्रत्येक सदस्यामागे तीन लाख रुपयांचे विमा कवच मिळवून दिले आहे. तसेच कोरोनामुळे एखाद्या कर्मचाऱयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना देय असलेल्या आर्थिक लाभाव्यतिरिक्त तीन वर्षांचा पगार अर्थ सहाय्य म्हणून देण्याचे मान्य केले आहे. या वेतन करारावर स्वाक्षरी करताना संचालक पराग बेंगाली, मकरंद परब, भारतीय कामगार सेनेच्या वतीने उपाध्यक्ष अजित साळवी, मोहन ठाकूर, जयवंत थिटे, कृष्णकांत कदम, प्रदीप दळवी, अजय पाठक, अविनाश आंबरे उपस्थित होते.