
मुंबईचा 12 ऑक्टोबर रोजी खंडित झालेल्या वीज पुरवठय़ाची तांत्रिक चौकशी करण्यासाठी ऊर्जा विभागाने सात सदस्यांची समिती नेमली होती. या समितीला अहवाल देण्यासाठी सात दिवसाची मुदत देण्यात आली होती. मात्र चौकशी समितीच्या विनंतीनुसार आज ऊर्जा विभागाने 5 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
महापारेषणच्या उच्च दाब वीज वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील वीज पुरवठा चार-पाच तास वीज पुरवठा खंडित झाला होता.
राज्य सरकारने त्याची गंभीर दखल घेत आयआयटी मुंबईचे प्राध्यापक बी. जी. फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची समिती नेमली होती. परंतु खंडित वीज पुरवठय़ाच्या चौकशीची व्याप्ती मोठी असल्याने समितीने मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार ऊर्जा विभागाने अहवाल सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे.



























































