कोरोना आटोक्यात, रुग्णसंख्या घटल्याने निम्मे बेड रिकामे!

कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या चांगलीच आटोक्यात आली असून पालिकेने तैनात ठेवलेल्या बेडपैकी तब्बल निम्मे बेड रिकामे आहेत.

यामध्ये लक्षणे असलेल्या रुग्णांसाठीच्या 18 हजार 477 बेडपैकी 8 हजार 607 तर कोरोना केअर सेंटरमध्ये 6523 बेड रिक्त आहेत. शिवाय 403 आयसीयू, 4 हजार 145 ऑक्सिजन आणि 190 व्हेंटिलेटर सद्यस्थितीत रिक्त असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना ऑगस्टअखेरपासून पुन्हा वाढू लागल्याने पालिकेसमोर आव्हान निर्माण झाले. यातच लॉकडाऊन शिथील झाल्याने कोरोनाचा धोका वाढला.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या नियोजनाने मुंबईत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. यामध्ये मुंबईत घरोघरी जाऊन तपासणी, स्क्रिनिंग आणि सर्वेक्षण, जनजागृती करण्यात येत आहे. 15 सप्टेंबरपासून राबवण्यात येणार्‍या या मोहिमेला आता चांगलेच येत असून रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे.

अशी आहेत सद्यस्थिती

प्रकार उपलब्ध बेड रुग्ण असलेले रिक्त

  • सीसीसी-2 18477 9870 8607
  • डीसीएचसी 15107 8584 6523
  • आयसीयू 2040 1637 403
  • ऑक्सिजन 9271 5126 4145
  • व्हेंटिलेटर 1185 995 190
आपली प्रतिक्रिया द्या