गर्दीचा फायदा घेऊन चोरायचा सोनसाखळी

210

गर्दीचा फायदा घेऊन सोनसाखळी चोरणाऱयाला अंधेरी रेल्वे पोलिसांनी अटक केली. राजू पाटील असे त्याचे नाव आहे तर सोने विकत घेणाऱया तीन व्यापाऱयांना अटक केली आहे. सोनसाखळी चोराविरोधात अंधेरी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्याच दरम्यान राजू हा अंधेरी परिसरात येणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक भारत चौधरी यांच्या पथकाने सापळा रचून राजूला ताब्यात घेतले. राजू गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरत असायचा. चोरलेले दागिने तो व्यापाऱयांना विकत होता. चोरीप्रकरणी पोलिसांनी तीन व्यापाऱयांनादेखील अटक केली. ते चोरीचे दागिने लगड करून इतरांना विकत असायचे अशी माहिती समोर आली आहे. या चौघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या