कोरोनामुळे लांब काठीने वरमाला घालून लग्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेकांना लग्न सोहळे पुढे ढकलावे लागत आहेत आणि ज्यांना ठरलेला मुहूर्त टाळायचा नाही त्यांना मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शुभविवाह उरकावा लागत आहे. त्यातही सोशल डिस्टन्सिंगचे सक्तीने पालन करावे लागत आहे. एका लग्नात तर वधू-वरांनी एकमेकांना वरमालाही अंतर पाळण्यासाठी लांब काठीने घातली. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हा लग्नसोहळा कुठला आहे याची माहिती नाही, पण निश्चितच तो आताच झालेला आहे. कारण स्टेजवर फक्त वधू-वर असे दोघेच दिसत आहेत. एरवी लग्न लावताना वधू-वरांच्या पाठीमागे नातेवाईकांची गर्दी असते, पण या व्हिडीओत वधू-वरांशिवाय इतर कुणीही नाही. मंगलाष्टके संपल्यानंतर दोघांनीही दोन काठय़ांच्या आधारे एकमेकांना पुष्पहार घातले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी हा नवा फंडा असला तरी तो कौतुकास्पदच आहे, अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर व्यक्त होत आहेत. कुणाच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना आली असेल? असा सवालही अनेकांनी केला आहे.