
मुंबईत आता कोरोना पूर्ण नियंत्रणात आला असून एकूण 17 हजार 800 अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 12 हजार 412 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसल्याचे समोर आले आहे. तर फक्त 5388 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. विशेष म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 81 टक्क्यांवर गेले असून डबलिंग रेटही86 दिवस झाला आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली.
मुंबईत पालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी युद्ध पातळीवर केल्या जाणाNया उपाययोजनांमुळे दररोज आढळणाNया रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. 17 ऑगस्ट रोजी ही संख्या 753 पर्यंत खाली आली आहे. मुंबईतील सरासरी रुग्णवाढ0.8 म्हणजेच सर्वात कमी असल्याचे पालिका आयुक्त चहल यांनी सांगितले आहे. मुंबईत 17 ऑगस्टपर्यंत तब्बल 1 लाख 4 हजार 301 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. विशेष म्हणजे 17800 अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 80 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा आहे. हे रुग्णही लवकरच कोरोनामुक्त होतील असा विश्वासही चहल यांनी व्यक्त केला.
330 आयसीयूसह सात हजारांवर राखीव बेड्स
– खास कोरोनाबाधितांसाठी सुरू केलेल्या डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटरमध्ये असणारे 7548 बेड सध्या रिक्त आहेत. मात्र आवश्यकता भासल्यास हे बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. यामध्ये 330 आयसीयू बेडचाही समावेश आहे.
– मुंबईत आतापर्यंत 6 लाख 60 हजारांवर कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. संपूर्ण देशात ही संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील अतिजोखमीचे संपर्वâही मोठ्या प्रमाणात शोधले जात आहेत. यामध्ये एका दिवसांत 5 हजार 369 अतिजोखमीचे संपर्क शोधून आवश्यक कार्यवाही करण्यात आली.



























































