मुंबईत आज 1,200 नवे रुग्ण, 48 जणांचा मृत्यू

742

मुंबईत आज कोरोनाचे 1,200 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 48 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 884 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या आता 1 लाख 954 वर पोहोचली आहे.

मुंबईत 48 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 6 हजार 988 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 87 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 19 हजार 332 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 6 लाख 29 हजार 899 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 27,571 वर पोहोचली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या