
मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने कोरोनाविरोधात राबवलेल्या मोहिमांमुळे मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी सरासरी 300 दिवसांवर म्हणजे 10 महिन्यांवर पोहोचला आहे. यामुळे कोरोना संसर्गाचा वेग मंदावला असला तरी पालिका सर्व संभाव्य धोक्यांविरोधात सावध असून आरोग्य यंत्रणा सतर्प आहे.
दुकानदार, हॉटेल कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी
महापालिकेने मुंबईकरांशी तुलनेने अधिक संपर्प येणाऱया व्यवसायिकांची कोरोनाविषयक वैद्यकीय चाचणी करून घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत विविध दुकानदार, दुकानात, हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी, बेस्टचे चालक-वाहक इत्यादींची कोरोनाविषयक चाचणी नियमितपणे करण्यात येत आहे.

























































