वाढत्या कोरोनाचा धसका, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पर्यटक घटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढत्या कोरोनाचा धसका पर्यटकांनीही घेतला असून वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पर्यटक तिपटीने घटले असून सुट्टीच्या दिवशी ही संख्या 12 हजारांवरून 3 हजारांवर आली आहे. त्यामुळे उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या महसुलातही मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 महिने बंद असलेले भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय 15 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू झाले, मात्र काही दिवसांपासून मुंबईत पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. पूर्वी रोज पाच ते सहा हजार पर्यटक येत होते तर सुट्टीच्या दिवशी हीच संख्या 10 ते 12 हजारांवर जात होती. मात्र फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे पर्यटकांची संख्या घटली आहे. दरम्यान, महिन्याभराचे 40 लाख उत्पन्न मिळाले आहे.

पर्यटकांसाठी खबरदारी

राणीबाग सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच खुली ठेवण्यात येते. यामध्ये प्राणी-पक्ष्यांच्या पिंजऱयांजवळ, तिकीट खिडकीजवळ सुरक्षित अंतराचे मार्पिंग करण्यात आले आहे तर ठिकठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. शिवाय प्राण्यांचे पिंजरे पारदर्शक काचांचे असल्यामुळे प्राण्यांची आणि पर्यटकांची सुरक्षितता जपली जात आहे.