कांदिवलीत दोन अल्पवयीन मुलींवर एकाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणी एकाला समता नगर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे, तर नालासोपाऱ्यात मुंबईतील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी दोन्ही नराधमांना अटक केली असून त्यांच्यावर पोक्सो गुन्हा दाखल केला आहे. मैत्रिणीच्या घराशेजारच्या फोटो स्टुडिओत काम करणाऱ्या 25 वर्षीय सोनू या तरुणाने ओळखीचा गैरफायदा घेत अत्याचार केला.