
वर्गात बडबड करत होती म्हणून पाचवीच्या विद्यार्थिनीला शिक्षिकेने अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना चेंबूरमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षिकेची चौकशी सुरू आहे.
चेंबूरमधील एका शाळेत शुक्रवारी वर्गात बोलत होती म्हणून शिक्षिकेने मारहाण केली. विद्यार्थिनीच्या मनगटावर, पाठीवर आणि कंबरेवर काठीने मारहाण केली. यात विद्यार्थिनी जखमी झाली.
विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांखाली आणि बाल न्याय कायद्यानुसार शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































